Loading...

Vidya Kakade, Library Educator in Kamala Nimbkar Bal Bhavan School encouraged grade 6 students communicate with their favourite author through letter writing. This was her way to bring the author alive and create a bond between readers, in this case, her middle school students and authors.

Vidya Kakade (Librarian)

Kamala Nimbkar Bal Bhavan School (Phaltan)

पत्र संवाद

आज काल मुले वाचनापासून खूप दूर जाताना दिसत आहेत. पण आमच्या शाळेत नेहमी हाच प्रयत्न असतो की मुलांची व पुस्तकांची गट्टी जमवून आणणे. ह्यासाठी आम्ही दर वेळी काहीतरी वेगळे प्रयोग करत असतो.

मी ६ वी चा तास घेत असताना त्याच्याशी लेखकांची नावे व पुस्तकांची नावे सांगून त्यांना असे सांगितले की कोणते पुस्तक कोणाचे आहे ते सांगा. अनेकांनी हात वर करुन बरोबर उत्तरे दिली. मग मी त्यांना म्हणाले “जर तुम्हाला तुमच्या आवडत्या लेखकाला पत्र लिहिण्याची संधी मिळाली तर?” मुलांनी लगेच गोंधळ सुरु केला ‘ताई मी मिरासदाराना  लिहिणार.’ ‘ताई मी शंकर पाटलांना.’

त्याचवेळी मी त्या संधीचा फायदा घेऊन मुलांना त्यांच्या आवडत्या लेखकांना पत्र लिहिण्यास सांगितले. ग्रंथालयात एकदम शांतता पसरली व मुले पत्र लिहिण्यात रमून गेली.

मी काहींची पत्रे वाचली ती इतकी सुंदर लिहिली होती की जणू लेखक खरचं त्यांच्या समोर आहेत. हर्षदा लोंढेने ‘जादूची पावडर’ ही कथा तु.ता.सावंत ह्यांच्या लेखनावरून लिहिली. ह्या वरून कोणत्या लेखकाची पुस्तके मुले जास्त वाचतात. तसेच त्यांना कोणत्या पद्धतीची पुस्तके वाचनास आवडतात हे समजले. त्याच प्रमाणे लेखक हा अदृश्य स्वरुपात असतो. तो मुलांच्या समोर कधी येत नाही. पण ह्या माध्यामातून तो मुलांच्या समोर आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यातील दोन प्रत जोडत आहोत|

Sharing the LEC experience

It has been a week since I am back from LEC and I have thought to share a chunk of my experience I have gathered in my first contact. Before going into the course…

Niju Mohan Parag Nurtures 2 May 2018

When Learning is Handcrafted…

I saw Ludwig Mies van der Rohe’s aphorism ‘God is in the detail’ come alive as I walked into the LEC 2018 classroom in the St Joseph Vaz Spiritual Centre in Goa…

Niju Mohan Library Educator's Course 1 May 2018